शहर

दारू दुकानातून चार लाख लुटणाऱ्या दोघांना अटक


पुणे : कात्रज-देहू रोड बायपासवरील भूमकर चौकात १२ एप्रिल रोजी एका कर्मचाऱ्याला धमकावून दारूच्या दुकानातून चार लाखांचा ऐवज लुटणाऱ्या दोघांना नर्हे पोलिसांनी रविवारी अटक केली. नर्हे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक आसाराम शेटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यश सतीश खवळे (२०) आणि रुषिकेश उद्धव लाखे (२०, दोघे रा. नर्हे) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख रुपये रोख, मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले. TNN

Source link
Auto GoogleTranslater News


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *