उद्योग

इंदोरीत विकासाचा निर्धार. सौ. मेघाताई प्रंशात भागवत यांचे जंगी स्वागत, महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा


इंदोरीत विकासाचा निर्धार. सौ. मेघाताई प्रंशात भागवत यांचे जंगी स्वागत, महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा

इंदोरी (मावळ) माझ्या भागाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वसामान्य नागरिक, माता-भगिनी आणि तरुणांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा माझा संकल्प आहे, असे ठाम प्रतिपादन सौ. मेघाताई प्रंशात भागवत यांनी केले. इंदोरी येथे आयोजित प्रचार रॅली दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी गावकऱ्यांनी फुलांच्या वर्षावात आणि घोषणांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

कार्यक्रमस्थळी महिलांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. माता-भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावत सौ. मेघाताई भागवत यांना उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला. गावातील विकासकामांसाठी त्यांची स्पष्ट भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि लोकांशी असलेला थेट संवाद यामुळे महिलांमध्ये विशेष विश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

सौ. मेघाताई भागवत पुढे म्हणाल्या कि इंदोरी आणि परिसरातील मूलभूत सुविधा बळकट करणे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये दर्जात्मक सुधारणा करणे हे माझे प्राधान्य असेल. महिलांचे सक्षमीकरण, स्वयंसहायता गटांना बळ देणे, युवकांसाठी कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करणे यावर विशेष भर दिला जाईल. गावाच्या विकासासाठी प्रशासनाशी समन्वय साधून वेळेत आणि पारदर्शक कामकाज केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रचार रॅलीत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सौ. मेघाताई भागवत यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत विकासासाठी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना, आमच्या प्रश्नांना समजून घेणारे नेतृत्व आम्हाला मिळत आहे.अशी प्रतिक्रिया दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ.मेघाताई भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानत.हा विश्वास आणि पाठिंबा मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो. सर्वांच्या सहकार्याने इंदोरीचा विकास नवी उंची गाठेल. असा विश्वास व्यक्त केला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *