निधन वार्ता तळेगाव दाभाडेतील निर्मला माने यांचे अल्पशा आजाराने निधन
निधन वार्ता
तळेगाव दाभाडेतील निर्मला माने यांचे अल्पशा आजाराने निधन
तळेगाव दाभाडे : येथील कैकाडी समाज तरुण मंडळाचे कार्यकर्ते अनिल दत्तात्रय माने व दीपक दत्तात्रय माने यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला दत्तात्रय माने यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समाजकार्याची आवड असलेल्या माने कुटुंबियांच्या पाठीशी त्या कायम खंबीरपणे उभ्या राहत असत. त्यांच्या साधेपणा व प्रेमळ स्वभावामुळे शेजारी, नातेवाईक आणि समाजबांधवांमध्ये त्यांना विशेष मान होता.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज, रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता श्री बनेश्वर स्मशानभूमी येथे होणार आहे.





