श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती २०२६-२७ ची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर
श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती २०२६-२७ ची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री डोळसनाथ महाराज मंदिर देवस्थानाच्या उत्सवासाठी २०२६-२७ या वर्षाकरिता नव्या उत्सव समितीची निवड नुकतीच पार पडली. गावातील ज्येष्ठ मंडळी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे आगामी वर्षातील उत्सवाची तयारी अधिक जोमाने सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. अक्षय अशोक पाटोळे यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी मिथुन रामदास भेगडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून श्री. योगेश विलास भेगडे, रोहन शाम चंदनशिवे, श्री. स्वप्नील लक्ष्मण भेगडे आणि चरण भेगडे यांची निवड करण्यात आली.
खजिनदारपदी श्री. गौरव देवीदास परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली असून सहखजिनदार म्हणून श्री. विकास गौतम दिवे, नीरज केदारी आणि गणेश शामराम शेलार यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी कु. ओम शरद भेगडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चिटणीस म्हणून सनी गुलाब आंद्रे, दीपक धनाजी जाधव, ओंकार भेगडे, रोहित आनंदा जाधव आणि शिवम् गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली.
प्रसिद्धी प्रमुखपदी संदेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कुमार डोणकरी, आकाश जगताप आणि पीयूष जाधव हे सहकार्य करणार आहेत.
या बैठकीस माजी अध्यक्ष श्री. संतोष किसनराव भेगडे, श्री. संतोष छबूराव भेगडे (नगरसेवक, तळेगाव दाभाडे), श्री. विनोद अशोक भेगडे (नगरसेवक), पै. सोमाभाऊ अनिल भेगडे (प्र. गाडामालक), विक्रमभाऊ दाभाडे (प्र. गाडामालक), श्री. विनायक वसंत भेगडे, श्री. सूरज सातकर(नगरसेवक) मिथुन काकडे, अजिंक्य अनिल सातकर, गोकुळ अनिल भेगडे, प्रणव मारुती भेगडे, शुभम लांडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत उत्सव अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामदैवताच्या उत्सवाबाबत गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी नियोजन बैठका लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.





