सलोनीताई सचिन वायकर यांच्या आयोजनातून कामशेतमध्ये खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न :रणजीत काकडे यांचे सौजन्य शिलाताई वंजारी प्रथम क्रमांकाच्या मानकरी
सलोनीताई सचिन वायकर यांच्या आयोजनातून कामशेतमध्ये खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न :रणजीत काकडे यांचे सौजन्य शिलाताई वंजारी प्रथम क्रमांकाच्या मानकरी
कामशेत : दत्त कॉलनी, कामशेत येथे युवा उद्योजक रणजीत रामदास काकडे यांच्या सौजन्याने आणि कामशेत भाजप युवती अध्यक्षा सलोनीताई सचिन वायकर यांच्या आयोजनातून खेळ रंगला पैठणीचा हा महिलांसाठीचा मनोरंजनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना विरंगुळ्याची संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक सलोखा वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
स्पर्धेत शिलाताई मिलिंद वंजारी यांनी प्रथम, रोहिणी काजळे यांनी द्वितीय, गिरंजे ताई यांनी तृतीय, निकिता टाकवे यांनी चतुर्थ, तर अर्चना पाटेकर यांनी पंचम क्रमांक पटकावला. लकी ड्रॉमध्ये अश्विनी काजळे, अश्विनी मावकर आणि वनिता शिळवणे या विजेत्या ठरल्या.
विजेत्या महिलांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांचा सहभाग, मनोरंजन आणि सामाजिक एकोपा यांचा संगम साधणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम वेळी कामशेत शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, मंडळ अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, युवा अध्यक्ष तुषार शिंदे, कार्याध्यक्ष दत्ता भोईर. ओबीसी अध्यक्ष रमेश सुतार, विद्यार्थी अध्यक्ष सुहास लोणकर,युवा नेते महेश शिंदे तसेच कामशेत महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा ताई बच्चे, माजी. अध्यक्षा मीनाताई मावकर,माजी सदस्य मिनाक्षीताई काळे, ओबीसी अध्यक्ष उमाताई काळे, दीपिकाताई पवार कार्याध्यक्षा भाजपा, सुवर्णा शिंदे कार्याध्यक्षा. त्याचबरोबर सर्व ग्रामस्त आणि महिला वर्ग उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत सुरेख असा उपक्रम राबवला याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.





