चिखलीत गणेश इंटरनॅशनल स्कूल स्नेहसंमेलन संपन्न,
चिमुकल्यांच्या कलागुणांनी जिंकली उपस्थितांची मने
चिखली : प्रतिनिधी: एस एस पी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल अँड सीनियर सेकंडरी, येथे वार्षिक सन २०२५–२६ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
चिखली टाऊन हॉल PCMC येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात २० डिसेंबरला “Festival Fiesta”, व २१डिसेंबरला “The Saga of Superheroes” आणि “The Legends of Maharashtra” या भव्य संकल्पनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर व पालकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय वाद्यवृंदाच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात समाजातील दिवंगत व्यक्तींप्रती संवेदनशीलतेने श्रद्धांजली (Condolence) अर्पण करण्यात आली. प्राचार्या आभा सिंग व भारती गडद यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करून शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला.

२१ ला रोजी नर्सरी , एल के जी, यू के जी व इयत्ता पहिली–दुसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य (Swagatam Dance) सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे विद्यार्थ्यांनी विविध सण, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्यनाट्य सादर केले. शिवजयंती, जन्माष्टमी, महाशिवरात्री, होळी, ईद, बैसाखी, मकरसंक्रांत, आषाढी एकादशी, वारी गीत, गणेश चतुर्थी, ओणम, दिवाळी, ख्रिसमस व नववर्ष या सणांवर आधारित सादरीकरणांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रमुख पाहुणे अविनाश पाठक (गायक), सायली काने (नृत्यांगना) उपस्थित होते.

२२ ला “The Saga of Superheroes” या संकल्पनेची प्रभावी मांडणी केली. विद्यार्थ्यांनी बाल गणेश, हनुमान, श्रीकृष्ण, छोटा भीम, हॅरी पॉटर, अवेंजर्स व छोटा सिंघम या व्यक्तिरेखांमधून सादर केलेली नृत्ये व अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक सादरीकरणाला जोरदार टाळ्यांची दाद मिळाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. जिल्हा न्यायाधीश डॉ. बी. एस. खराडे , कॉर्पोरेटर निलेशदादा नेवाळे, ॲड. पडवळ उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलिस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतील पालक व पोलीस कॉन्स्टेबल योगेश मुजुमदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्व पात्रांचा भव्य रॅम्प वॉक हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या सत्रात “The Legends of Maharashtra” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास लिटल चॅम्प मास्टर देवांश भाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व शिवरायांचे छावे, पेशवा बाजीराव, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदी गोपाळ जोशी, लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्रभावीपणे सादर केला. लता मंगेशकर, महाराष्ट्र शाहीर आणि सचिन तेंडुलकर यांना अर्पण केलेल्या सादरीकरणांनी कार्यक्रमात अभिमानाची भावना निर्माण केली. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन व देशभक्तीपर “वंदे मातरम्” या गीताने करण्यात आला. गणेश इंटरनॅशनल स्कूलचे हे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे, संघभावनेचे आणि सांस्कृतिक जाणिवांचे प्रभावी दर्शन घडवणारे ठरले. या दोन्ही कार्यक्रमांना एस एस पी शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील,

सचिव चंद्रशेखर प्रभू पाटील, विश्वस्त गणेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, प्रशांत तराके, स्नेहल पाटील, ऐश्वर्या पाटील,पूजा पाटील, मल्लिका तराके, चक्रवर्ती माडिवाळ, प्रशासन अधिकारी प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक सुनील शेवाळे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रविणकुमार साबळे ,डॉ.अभिजीत चव्हाण, शिल्पा गायकवाड, प्ले स्कूलच्या प्राचार्या भारती गडद, जीआयएस चिखलीच्या प्राचार्या आभा सिंगयांची उपस्थिती लाभली. तसेच शाळेचे समन्वयक विनोद जगदाळे, दुहिता कुलकर्णी, विजयलक्ष्मी हाके, महेश मालवदे व श्रीनिवास सूर्यवंशी ,सतीश शेळके , मदन वाघमोडे, दौलत कांबळे, त्यगिनी रामगडे, मोनिका गांजाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यास सहकार्य लाभला .मोठ्या संख्येने पालकवर्गांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.





