ताज्या घडामोडीशहरसामाजिक

पत्रकार चैत्राली राजापुरकर यांना महिला कार्यगौरव पुरस्कार:तळेगाव दाभाडेत महिला सस्नेह मेळावा उत्साहात


पत्रकार चैत्राली राजापुरकर यांना महिला कार्यगौरव पुरस्कार:तळेगाव दाभाडेत महिला सस्नेह मेळावा उत्साहात

 

तळेगाव दाभाडे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी मध्य महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने महिला सस्नेह मेळावा व महिला कार्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला.

 

महिलांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात मावळ तालुक्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या झी २४ तासच्या प्रतिनिधी चैत्राली राजापुरकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा महिला कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार त्यांच्या पत्रकारितेतील समर्पित कार्य, सामाजिक प्रश्नांवरील भक्कम मांडणी आणि जनतेच्या प्रश्नांना दिलेल्या वाचा याची दखल घेत प्रदान करण्यात आला.

 

कार्यक्रमादरम्यान महिलांच्या सामाजिक सहभाग, नेतृत्व आणि समाजघडणीतील योगदानावर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला सस्नेह मेळाव्यात उपस्थित महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

 

या सन्मानामुळे मावळ तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकार चैत्राली राजापुरकर यांच्या कार्याचा गौरव झाल्याने स्थानिक पातळीवर अभिमानाची भावना व्यक्त होत असून स्त्री सन्मान हीच मावळची खरी ओळख असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

 

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम समाजातील कर्तृत्ववान महिलांना प्रेरणा देणारा ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *