२०मार्च रोजी तळेगावात स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
२०मार्च रोजी तळेगावात स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
तळेगाव दाभाडे : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त भव्य स्वामी समर्थ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार असून पालखी सोहळा व महाप्रसादाचे विशेष आकर्षण राहणार आहे.
परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशिर्वादाने आयोजित या सोहळ्याचे नियोजन गणेश मोहनराव काकडे (उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगर परिषद) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता श्री स्वामी समर्थ मंत्राच्या हवनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी ३:४५वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन व हवन आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ ते रात्री ८:३०या वेळेत भव्य पालखी सोहळा पार पडणार असून यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पालखीचा मार्ग सप्तशृंगी माता मंदिर (इंद्रायणी कॉलनी) येथून सुरू होऊन आनंदनगर, मनोहरनगर, वनश्रीनगर, श्री स्वामी समर्थ मंदिर, सेम्को कॉलनी, मोहननगर मार्गे पुन्हा सप्तशृंगी माता मंदिर येथे समाप्त होणार आहे.
रात्री ८:३० वाजता आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्सवाचे स्थळ सप्तशृंगी माता मंदिर, इंद्रायणी कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे निश्चित करण्यात आले आहे.
स्वामी समर्थ जयंती उत्सवानिमित्त आयोजित पालखी सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश मोहनराव काकडे यांनी केले आहे.





