नगराध्यक्ष गृहनिर्माण सोसायटी चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे तळेगाव दाभाडेत भव्य आयोजन
नगराध्यक्ष गृहनिर्माण सोसायटी चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे तळेगाव दाभाडेत भव्य आयोजन
तळेगाव दाभाडे : नगराध्यक्ष गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने आयोजित नगराध्यक्ष गृहनिर्माण सोसायटी चषक २०२६ क्रिकेट (हाफ पिच) टर्फ टूर्नामेंटचे आयोजन रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आले आहे. ही स्पर्धा स्पोर्टीकिओ अॅरिना, आमराई हॉटेलजवळ, तळेगाव दाभाडे येथे होणार असून या स्पर्धेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
ही स्पर्धा पुरुष व महिला संघांसाठी खुली असून, सोसायटीतील सदस्यांमध्ये खेळभावना, आरोग्य जाणीव तसेच आपुलकी वाढविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. हाफ पिच टर्फवर होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंना आधुनिक सुविधांचा अनुभव मिळणार आहे.
या संदर्भात बोलताना प्रा. नितीन फाकटकर यांनी सांगितले की, नगराध्यक्ष गृहनिर्माण सोसायटी नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देत आली आहे. ३० वर्षांवरील सदस्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करून त्यांच्या दैनंदिन तणावातून विरंगुळा मिळावा, तसेच आरोग्यदृष्ट्या सक्रिय राहावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेच्या नियम व अटींनुसार प्रत्येक संघात ७ खेळाडू असणे आवश्यक असून, सर्व खेळाडू हे नगराध्यक्ष गृहनिर्माण सोसायटीचे अधिकृत सदस्य असणे बंधनकारक आहे. खेळाडूंचे वय किमान ३० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. नोंदणीसाठी प्रत्येक खेळाडूकडून २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, हे शुल्क बंधनकारक आहे.
या स्पर्धेसाठी इच्छुक संघांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. नितीन फाकटकर (संस्थापक) – ९८९०७९८९६० यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमाला अध्यक्ष बाळासाहेब लोणकर तसेच उपाध्यक्ष सुधीर टकले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.





