निधन वार्ता
निधन वार्ता
तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक .एक संयमी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची दुःखद घटना आज घडली. अविनाश (दादा) गोखले यांचे गुरुवार, दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
अविनाश गोखले हे मनमिळावू, शांत आणि सर्वांना आपलेसे करून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांच्या कामातील काटेकोरपणा आणि सहकाऱ्यांशी जपलेले सुसंवाद यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचा अंत्यविधी आज रात्री १० वाजता बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे संपन्न होणार आहे. अंत्ययात्रा घोरवाडी स्टेशन परिसरातील अशोक विक्रम सोसायटी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.





