सामाजिक

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुस्तकापलीकडचे शिक्षक रोटरी शिक्षक रत्न पुरस्कार २०२६ उत्साहात संपन्न


शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुस्तकापलीकडचे शिक्षक रोटरी शिक्षक रत्न पुरस्कार २०२६ उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे: शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेतर्फे पुस्तकापलीकडचे शिक्षक हा कार्यक्रम लायन्स क्लब हॉल येथे शुक्रवारी (दि.४) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वोकेशनल डायरेक्टर डिस्ट्रिक्ट ३१३१ योगेश भिडे हे होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष प्रमोद दाभाडे,
उपाध्यक्ष प्रसाद मुंगी, वोकेशनल डायरेक्टर सागर शर्मा, सांस्कृतिक डायरेक्टर शर्मिला शहा व्यासपीठावर उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते
नेहा राणी (विशेष विद्यार्थी शिक्षक ),
ज्योती चौरे (संस्कृत शिक्षक),
नयना डोळस (विशेष विद्यार्थी क्रीडाशिक्षक ),
ज्योती गडाख (योगा झुंबा शिक्षक ), ऋचा वळवडे (जर्मन भाषा शिक्षक),
मुग्धा जोर्वेकर ( दृष्टी हिनांसाठी ऑडिओ पुस्तके ),प्राजक्ता पोळ (दुचाकी वाहन प्रशिक्षण ),
युवराज पारगे (बॅडमिंटन शिक्षक),प्रफुल्ल कवळे (कराटे ),दिपाली सावंत (मराठी विशेष शिक्षक ),यांना गौरविण्यात आले.
तळेगाव दाभाडे येथील रोडसेट सेंटर संस्थेला मानाचा वोकेशनल एक्सलन्स
अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमोद दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी रोटरी या सेवाभावी संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली.
क्लब राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे डॉ अंकुश गुंड यांनी रोटरीच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. योगेश भिडे यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल गौरव उद्गार काढले. सर्व सन्मानार्थिंना घेऊन रोटरी कसे काम करू शकेल याबद्दल माहिती सुचवली .
धनंजय मथुरे यांनी छायाचित्रण केले .हर्षदा दुबे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाला सोनबा गोपाळे गुरुजी,माजी अध्यक्ष यादवेंद्र खळदे, जयंत देशपांडे, श्रीशैल मेंथे, फर्स्ट लेडी वैशाली दाभाडे,राजेंद्र पोळ,विलास शहा,विकास उभे,ऋषिकेश कुलकर्णी, वेदांग महाजन, मकरंद जोशी, संगीता जाधव व रोटरी सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिव चेतन नामजोशी यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *