ताज्या घडामोडीशहर

ज्येष्ठ कामगार नेते दत्तात्रय भेगडे यांचे निधन


ज्येष्ठ कामगार नेते दत्तात्रय भेगडे यांचे निधन

तळेगाव दाभाडे: टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते कै. दत्तात्रय कुंडलिक भेगडे (वय ७६) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने कामगार संघटन क्षेत्रात तसेच सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. भेगडे यांनी टाटा मोटर्समध्ये दीर्घकाळ सेवा बजावत कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. युनियनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी संवाद, शिस्त आणि संघटनबळ या त्रिसूत्रीवर भर देत अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. कामगार कल्याण, सुरक्षितता व सामाजिक बांधिलकी यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. ते स्वभावाने मनमिळावू, स्पष्टवक्ते आणि तळागाळातील कामगारांशी थेट संवाद साधणारे नेते म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे तसेच पुतणे असा परिवार आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते विनित भेगडे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, सहकारी आणि असंख्य कामगार वर्गावर शोककळा पसरली आहे.

कै. दत्तात्रय भेगडे यांचा अंत्यविधी आज दुपारी १२.१५ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून कडोलकर कॉलनी येथून निघणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *