उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांची तत्पर कार्यवाही ; वतन नगरमधील धोकादायक चेंबर दुरुस्त
उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांची तत्पर कार्यवाही ; वतन नगरमधील धोकादायक चेंबर दुरुस्त
तळेगाव दाभाडे : शहरातील वतन नगर परिसरात भारत माता उद्यानालगत असलेल्या संरक्षण भिंतीजवळील उघड्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याच्या कडेला असलेले हे चेंबर कोणत्याही मजबूत झाकणाविना उघडेच पडले होते. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच परिसरातील लहान मुलांसाठी मोठा अपघाती धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांकडून याबाबत वारंवार चिंता व्यक्त केली जात होती.
दरम्यान, या धोकादायक परिस्थितीची दखल घेत मावळ दर्पण न्युज ने ४ एप्रिल रोजी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि कोणताही विलंब न लावता त्वरित सदरील चेंबर दुरुस्त करण्याचे आदेश दिले. त्यांच्या पुढाकारामुळे काही तासांतच चेंबरवर नवीन मजबूत झाकण बसवण्यात आले उघडा व तुटलेल्या अवस्थेत असलेले चेंबर दुरुस्त करून नवीन चेंबर टाकण्यात आले असून परिसरातील संभाव्य धोका टळला आहे.
या तातडीच्या कार्यवाही मुळे वतन नगर परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. समाज माध्यमांतून उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे आभार मानले. जात असून एक कॉल समस्या सॉल अशी ओळख निर्माण केलेल्या जनसेवकाचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सार्वजनिक सुरक्षेबाबत असलेली त्यांची संवेदनशीलता आणि तत्परता यामुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.
तळेगाव शहरात विविध नागरी समस्यांचे जलद निवारण करणारे नेतृत्व म्हणून गणेश काकडे यांची आधीपासूनच ओळख आहे. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत त्यावर त्वरित उपाययोजना करणारा सच्चा जनप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपला हेल्पलाइन क्रमांक सर्वसामान्यांसाठी खुला ठेवला असून कोणतीही समस्या कळताच तातडीने प्रतिसाद देण्याची त्यांची कार्यपद्धती आहे.





