महत्त्वाचे

निधन वार्ता


निधन वार्ता

तळेगाव दाभाडे :येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सुनंदा गणेश झेंडे (वय ९३) यांचे सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीमती झेंडे यांनी आपल्या शिक्षककीच्या कारकिर्दीत अनेक विद्यार्थ्यांना घडविले. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या शांत, विनम्र आणि मितभाषी स्वभावामुळे त्या सर्वांच्या परिचयातील व आदराच्या व्यक्ती होत्या. विद्यार्थ्यांप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या पश्चात मुलगा. सुन. नातू. नातसुन असा परिवार आहे. कलापिनी संस्थेचे विश्वस्त हेमंत झेंडे यांच्या त्या मातोश्री होत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देवेंद्र झेंडे यांच्या त्या आजी होत.

घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळील अशोक विक्रम सोसायटी येथून त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राहत्या घरापासून निघणार असून बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने तळेगाव दाभाडे परिसरात शोककळा पसरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *