सामाजिक

तरुण ऐक्य मित्र मंडळाची २०२६ चा कार्यकारिणी जाहीर


तरुण ऐक्य मित्र मंडळाची २०२६ चा कार्यकारिणी जाहीर

 

तळेगाव दाभाडे : घोरावाडी रेल्वे स्टेशन येथील तरुण ऐक्य मित्र मंडळ मरिमाता नवरात्र उत्सव समितीच्या २०२६च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा जपत यंदाही विविध उत्सव उत्साहात साजरे करण्याचा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मंडळाचे आधारस्तंभ नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते संतोष (दादा) मारुती भेगडे यांचे मार्गदर्शन मंडळाला दरवर्षी लाभते अध्यक्षपदी नरेंद्र (बंटी) भालचिम, उपाध्यक्षपदी आर्यन गणेश भेगडे, खजिनदारपदी आकाश कांबळे, तर सरचिटणीस म्हणून संकेश ओव्हाळ यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सचिन घोडके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तरुण ऐक्य मित्र मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, कन्यापूजन यांसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात. या माध्यमातून परिसरातील नागरिकांना एकत्र आणत धार्मिक आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचे काम मंडळाच्या वतीने केले जाते.

यंदाच्या वर्षीदेखील उत्सवांचे नियोजन अधिक व्यापक स्वरूपात करून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस कार्यकारिणीने व्यक्त केला. युवकांनी एकत्र येत उत्सवांचे आयोजन करताना सामाजिक बांधिलकी जपावी, तसेच परिसरातील नागरिकांचा सहभाग वाढवावा, यासाठी मंडळ प्रयत्नशील राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *