राजकीय

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या रक्षाबंधन सोहळ्यात मजनू नाटेकर उपस्थित; नगरसेवक पद रद्द झाले असताना नगरसेवक म्हणून की सामान्य नागरिक म्हणून?


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या रक्षाबंधन सोहळ्यात मजनू नाटेकर उपस्थित; नगरसेवक पद रद्द झाले असताना नगरसेवक म्हणून की सामान्य नागरिक म्हणून?

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर नगरसेविकांच्या पुढाकाराने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगरसेविकांनी नगरसेवकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक पत्रकार बांधवही उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमातील एका उपस्थितीने शहरात प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

नगरसेवक मजनू हनुमंत नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.असे असताना ते नगरसेवकांच्या पंक्तीत या सार्वजनिक कार्यक्रमात नेमक्या कोणत्या भूमिकेत सहभागी झाले? हा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मजनू नाटेकर यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे तर त्यांनी सामान्य नागरिक म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती का? की नगरसेवक म्हणूनच त्यांचा सहभाग होता? असा थेट प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

नगरपरिषद कार्यालयातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये कोणाला कोणत्या पदाच्या नात्याने सहभागी करून घेतले जाते, याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. पद रद्द झाले असताना प्रोटोकॉल काय सांगतो आणि पद कायम असेल तर त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण का नाही? या प्रश्नांची उत्तरे नगरपरिषद प्रशासनाने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी होत आहे.

रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदाचा असला, तरी एका उपस्थितीने निर्माण केलेले प्रश्न मात्र गंभीर आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करून नागरिकांच्या संभ्रमावर पडदा टाकावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *