सामाजिक

तळेगावमध्ये जिवंत देखाव्यांवर भर:मानाचे गणपती: गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक रोषणाई, फुलांची आरास, भक्तांची गर्दी


तळेगावमध्ये जिवंत देखाव्यांवर भर:मानाचे गणपती: गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक रोषणाई, फुलांची आरास, भक्तांची गर्दी

तळेगाव दाभाडे: पावसाने उघडीप दिल्याने तळेगाव दाभाडे शहर परिसरात देखावे पाहण्यासाठी रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. शुक्रवारी (दि.१८) देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
तळेगाव शहरात लहान-मोठी सुमारे १२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. अनेक मंडळांनी देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. यावर्षी बहुतेक मंडळांनी हलत्या आणि जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे. जिवंत देखाव्यातून मंडळांनी समाजप्रबोधन केले आहे. काही मंडळांनी स्थिर रेखावे तर काहींनी पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्यांचे सादरीकरण केले आहे.
अनेक मंडळांनी वृक्षारोपण व समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत.
मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक मंडळांनी रोषणाईवर आणि आकर्षक फुलांच्या सजावटीवर भर दिला आहे. मानाच्या पाचही सार्वजनिक गणेश मंडळांच्या
माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत. मानाचा पहिला तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज तालीम मंडळाचा रिद्धी -सिद्धी समवेत असलेला गणपती हा नवसाला पावणारा म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. मंडळाचे यंदाचे १२३ वे वर्ष असून सिद्धार्थ भेगडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाचे स्वतंत्र ढोल पथक आहे.
मानाचा दुसरा गणपती कालिका गणेशोत्सव मंडळ आहे .१९०३ मध्ये मंडळाची स्थापना झाली असून माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर मंडळाचे अध्यक्ष आहेत. विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात.
मानाचा तिसरा गणपती तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. मंडळाचे यंदाचे १२५ वे
वर्ष असून मिलिंद कसाबी अध्यक्ष आहेत. मंडळाच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात.
मानाचा चौथा गणपती
हिंदु तालीम ट्रस्टचा राजेंद्र चौक डाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. मंडळाची स्थापना १९०६ मध्ये झाली आहे . कुणाल कुंबरे
मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात. गणपती चौकातील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ हा असून मंडळाचे यंदाचे १२४ वे वर्ष आहे. श्रवण मेहता मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाचे स्वतःचे ढोल ताशा पथक आहे. अथर्वशीर्ष पठणसह विविध धार्मिक आणि समाजपयोगीउपक्रम राबविले जातात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *