आरोग्य

तळेगाव दाभाडे येथे वानप्रस्थाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिर


तळेगाव दाभाडे येथे वानप्रस्थाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

तळेगाव दाभाडे:येथील वानप्रस्थाश्रमात मंगळवारी १०मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. निगडी, प्राधिकरण, सेक्टर २७ येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद रुग्णालय व स्रोबेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. राधिका मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वृंदा कुरंडे, डॉ. अभिषेक टाकसाळे, डॉ. माधवी बनारसे, डॉ. मनीषा पिंगळे, डॉ. किरण मेंढेकर व डॉ. ऋजुता चंदनशिवे यांनी वैद्यकीय सेवा दिल्या. विशेषतः सांधेदुखीवर आयुर्वेदातील ‘अग्नी-विद्ध’ या प्रभावी उपचारपद्धतीचा वापर करून रुग्णांना दिलासा देण्यात आला.

याशिवाय, नेत्र तपासणी करून ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. रोहित विश्वकर्मा, डॉ. पूनम शिंदे व डॉ. नेहा कदापुरे तसेच प्रशिक्षणार्थी डॉ. प्रज्वल पाटील व डॉ. मधुरा तुलसे यांनी रक्तदाब व सामान्य आरोग्य तपासणी केली.

तपासणीदरम्यान अनेकांना आवश्यक औषधोपचार तसेच निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच आयुर्वेद रुग्णालयात सुरू असलेल्या विविध वैद्यकीय शिबिरांची व उपलब्ध सुविधांची माहितीही देण्यात आली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल वानप्रस्थाश्रमाच्या व्यवस्थापिका सौ. उर्मिला छाजेड यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *