तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत शहीद दिन साजरा.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत शहीद दिन साजरा.
तळेगाव दाभाडे: भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अद्वितीय बलिदानाची आठवण जागवणारा शहीद दिन तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात २३मार्च रोजी सकाळी ११ वाजता अत्यंत साध्या पण भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, गटनेत्या सौ हेमलता खळदे, नगरसेविका सौ सोनाली दरेकर तसेच नगरसेवक आमिर मुलानी यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहीदांच्या स्मृतींना आदरपूर्वक नमन केले.
कार्यक्रमाला नगरपरिषदेतील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात कल्याणी लाडे, मधुरा जोशी, नेहा पाटील, प्रशांत शिवणे, संदीप सोनवणे, प्रसाद गुरव, सुनील काळकुटे, स्मिता म्हस्के, भास्कर वाघमारे, अनिल इंगळे, संतोष दाभाडे, पुरुषोत्तम तेजी, रोहित भोसले, अतुल पठारे, शिला वेहेळे, शितल कडूसकर, शुभांगी माने, सुजाता घोडेकर, संध्या चव्हाण, रेवती खांदवे, मधुरा मुंडे, स्नेहल मते, मयुरी आडोळे, राहुल आगळे, आकाश बिडलान, सनी ननावरे आदींचा सहभाग होता.
या वेळी गटनेत्या सौ हेमलता खळदे यांनी आपल्या मनोगतात शहीदांच्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वातंत्र्य हे सहज मिळालेले नाही. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहिली. संपूर्ण वातावरणात देशभक्तीची भावना दाटून आली होती. साधेपणातही कार्यक्रमाची शिस्त आणि गांभीर्य जाणवत होते.
या उपक्रमातून नगरपरिषद प्रशासनाने शहीद दिनाचे औचित्य साधत कर्मचाऱ्यांमध्ये देशप्रेम आणि कर्तव्यभावनेची जाणीव अधिक दृढ केली. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला इतिहासातील बलिदानाची जाणीव होते, अशी प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.





