उद्योग

निधन वार्ता आदर्श माता नंदाताई गाडे यांचे दुःखद निधन


निधन वार्ता

 

नंदाताई गाडे यांचे दुःखद निधन

 

सुदुंबरे :येथील

शेतकरी कुटुंब व वारकरी सांप्रदयातील आदर्श माता नंदाताई सुखदेव गाडे (वय ६५) यांचे गुरुवारी (दि.९)हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.त्यांच्या मागे पती, दोन मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. समाजभूषण सदाशिवअण्णा गाडे यांच्या त्या सुनबाई, सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.

सुखदेव गाडे यांच्या पत्नी, उद्योजक सुमित गाडे व शशांक गाडे यांच्या त्या मातोश्री होत. सामाजिक कार्यकर्ते अंकुश

भेगडे, मोहन भेगडे, सर्वेश भेगडे, भास्कर भेगडे, दिलीप भेगडे आणि पत्रकार विलास भेगडे यांच्या त्या भगिनी होत. शुक्रवारी सकाळी सुदुंबरे

येथील स्मशानभूमीत

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक ,राजकीय, कृषी आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम बापू कदम , प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय गाडे, धोंडीभाऊ घोजगे,संजय गाडे, सोमनाथ गव्हाणे

आदींनी शोक भावना व्यक्त केल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *