नगरसेवक सागर बोडके व नगरसेविका सुरेखा भेगडे यांच्या पाठपुराव्याला यश:तळेगावात अंतर्गत रस्ता कामांचे भूमिपूजन
नगरसेवक सागर बोडके व नगरसेविका सुरेखा भेगडे यांच्या पाठपुराव्याला यश:तळेगावात अंतर्गत रस्ता कामांचे भूमिपूजन
तळेगाव दाभाडे: शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील तुकारामनगर परिसराच्या विकासाला चालना देणाऱ्या अंतर्गत रस्ता कामांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या या कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून, स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासकीय कालावधीत आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या विकासकामास मंजुरी मिळाली होती. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन नागरिकांनी सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यानंतर नगरसेवक सागर बोडके आणि नगरसेविका सुरेखा भेगडे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने रस्ता कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
भूमिपूजन प्रसंगी बोलताना नगरसेवक सागर बोडके यांनी सांगितले की, तुकारामनगर परिसरातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. अंतर्गत रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. आगामी काळातही विकासकामांचा वेग कायम ठेवण्यात येईल.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) नगरसेवक सुदाम शेळके. नगरसेविका सुरेखा निलेश भेगडे, नगरसेवक सूरज सातकर, दिनकर भेगडे, सुदाम भेगडे, उद्योजक निलेश भेगडे, विशाल भेगडे, राजू शिंदे, शरद बारमुख, नंदकुमार नागुलपिल्ले, विकी काकडे, प्रणव मराठे, कविता भेगडे, मंगल भेगडे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नगरसेविका सुरेखा भेगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर नगरसेवक सागर बोडके यांनी आमदार सुनील शेळके तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार मानत विकासकामांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. भूमिपूजनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत परिसराच्या विकासासाठी आणखी कामांची अपेक्षा व्यक्त केली.





