बत्तीस दातांच्या बत्तीस दंतकथा! डॉ. प्रविण माने यांचा शनिवारचा अभ्यासपूर्ण उपक्रम
बत्तीस दातांच्या बत्तीस दंतकथा! डॉ. प्रविण माने यांचा शनिवारचा अभ्यासपूर्ण उपक्रम
तळेगाव दाभाडे : दातांचे आरोग्य, दंतोपचार आणि त्याबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांना शास्त्रीय पद्धतीने उत्तरे मिळावीत, तसेच दातांविषयीच्या गैरसमजुती दूर व्हाव्यात, यासाठी तळेगाव दाभाडे शहरातील सुप्रसिद्ध डॉ. माने डेंटल केअर सेंटरचे डॉ. प्रविण रामभाऊ माने यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
बत्तीस दातांच्या बत्तीस दंतकथा या विशेष व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून दातांच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. दातांची योग्य निगा कशी राखावी, दंतोपचारांबाबत कोणत्या गोष्टी खऱ्या आणि कोणत्या केवळ दंतकथा आहेत, याबाबत सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत माहिती देण्याचा हा अभ्यासपूर्ण प्रयत्न आहे.
दातदुखी, हिरड्यांचे आजार, दातांची स्वच्छता, दंतउपचारांबाबत असलेले गैरसमज तसेच दैनंदिन जीवनातील दातांच्या आरोग्याशी निगडित अनेक प्रश्नांवर या मालिकेतून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य माहिती मिळण्यासोबतच दातांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
आता प्रत्येक शनिवार, दंतकथा ऐकण्याचा वार अशी संकल्पना घेऊन हा उपक्रम राबविला जात असून, नागरिकांनी या माहितीपूर्ण मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रविण माने यांनी केले आहे. आरोग्यविषयक माहितीला आधुनिक दंतशास्त्राची जोड देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.






