पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे:राजकीय वर्तुळातून एक दुख:द बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच नेते, पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी यांची तब्येत बिघडली होती,पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सुरेश कलमाडी यांच्यावरती उपचार सुरु होते. अशातच त्यांची आज प्राणज्योत मालवली. दुपारी २ वाजेपर्यंत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुरेश कलमाडी यांनी दीर्घकाळ राष्ट्रीय व राज्य पातळीवर राजकारणात सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.





