तळेगाव दाभाडे शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल; विविध पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी
तळेगाव दाभाडे शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल; विविध पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी
तळेगाव दाभाडे : काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने तळेगाव दाभाडे शहर काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, युवकांना सक्रियपणे जोडणे आणि विविध सामाजिक घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
तळेगाव दाभाडे शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सागर भाऊ पोळ यांची नियुक्ती करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहर युवक काँग्रेसच्या गाव विभागाच्या अध्यक्षपदी सम्राट कडोळकर, तर कार्याध्यक्षपदी प्रसाद बारमुख यांची निवड झाली.
युवक काँग्रेसच्या स्टेशन विभाग अध्यक्षपदी सिराज खान, कार्याध्यक्षपदी स्वप्निल निकाळजे, तर गाव विभागाच्या सरचिटणीसपदी शुभम कावडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अनंता शिंदे यांची आंदर मावळ विभागाच्या अध्यक्षपदी, तर गोरक्षनाथ वाघू विखारे यांची मावळ तालुका आदिवासी विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या नियुक्तीप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मोहन गोळे, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन गोळे, तालुका निरीक्षक विशाल पवार तसेच जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मोहसीन तांबोळी उपस्थित होते.
यावेळी मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, तळेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर मरिमुत्तू, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी लेंढघर, तालुका युवक अध्यक्ष अॅड. संदिप सातकर, तसेच खंडू तिकोणे, रोहिदास वाळुंज, अनिस तांबोळी, प्रतिमा हिरे, एकनाथ येवले, सागर वाळुंज, मधुकर कांद, शांताराम नरवडे, विक्रांत वाळुंज, सिद्धांत वाळुंज, किरण मोकाशी, सुकलाल शिंदे, राजीव फलके, नफीज खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेसची तळागाळातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याबरोबरच युवक आणि विविध सामाजिक घटकांना पक्षाच्या संघटनेशी जोडण्यासाठी सक्रियपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.





