सामाजिक

रणजित काकडे यांच्या वाढदिवसाचा उत्साह; बबनराव भेगडे यांची पुणे पिपल्स बँक अध्यक्षपदी निवडी :वाढदिवसाचा आनंद अन् अध्यक्षपदाच्या निवड चा सन्मान; तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचा अनोखा सोहळा!


रणजित काकडे यांच्या वाढदिवसाचा उत्साह; बबनराव भेगडे यांची पुणे पिपल्स बँक अध्यक्षपदी निवड : वाढदिवसाचा आनंद अन् अध्यक्षपदाच्या निवडीचा सन्मान; तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचा अनोखा सोहळा!

 

तळेगाव दाभाडे : सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक रणजीत रामदास काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. तसेच ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे यांची पुणे पीपल्स सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद आणि नेतृत्वाच्या नव्या जबाबदारीचा गौरव अशा दुहेरी आनंदाने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

 

यावेळी तळेगांव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन माडगुळकर, काकासाहेब काळे, रेशमा फडतरे, गणेश भेगडे, अंकुश दाभाडे, संदीप गाडेकर, संदीप भेगडे, सुरेश शिंदे, महेश भागिवंत, प्राध्यापक ऋषिकेश लोंढे, प्राध्यापक नितीन फाकटकर, केदार शिरसाट, राधाकृष्ण येणारे, चित्रसेन जाधव, रमेश जाधव (गुरुजी) यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रणजीत काकडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विलास भेगडे म्हणाले, वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेण्याची आणि भविष्यातील सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याची संधी असते. रणजीत काकडे यांनी उद्योजकतेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीत यश, उत्तम आरोग्य आणि सामाजिक कार्याची नवी उंची लाभो. माणसे जोडण्याची वृत्ती आणि समाजाप्रती असलेली आस्था हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे,

 

बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना बबनराव भेगडे म्हणाले, पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पत्रकार बांधवांनी एकजुटीने समाजाचे प्रश्न मांडावेत. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींना वाचा फोडून प्रशासनाचे लक्ष वेधावे. समाजहितासाठी निर्भीड आणि विधायक पत्रकारिता अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे.

 

शुभेच्छा, सन्मान आणि स्नेहपूर्ण संवादाने रंगलेल्या या सोहळ्याने पत्रकार बांधवांमधील एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *