अमित शहा यांच्या दौऱ्याआधी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी घेतले ताब्यात
अमित शहा यांच्या दौऱ्याआधी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी घेतले ताब्यात
तळेगाव दाभाडे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान संभाव्य निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. विशाल वाळुंज यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर उमेश पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.
या कारवाईवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे सत्ताधारी भाजपमधील एकेकाळी तडीपार असलेल्या नेत्यांसाठी जर विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले जात असेल, तर ही बाब लोकशाहीतील विरोधाच्या अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित करणारी आहे, अशा आशयाची टीका सोशल मीडियावर व्यक्त होत आहे तो ये डर अच्छा लगा या उपरोधिक शब्दांत कारवाईवर निशाणा साधला जात आहे
सत्ताधाऱ्यांच्या दौऱ्याआधी विरोधकांना ताब्यात घेण्याच्या या प्रकारामुळे शांततामय निषेधाचा घटनात्मक अधिकार आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून केली जाणारी प्रतिबंधात्मक कारवाई यांच्यातील मर्यादांवर चर्चा सुरू झाली आहे.
लोकशाहीत अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.





