यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत अभिवादन
यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत अभिवादन
तळेगाव दाभाडे :
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांच्या कार्याचा स्मरणोत्सव करत उपस्थितांनी कृतज्ञतेने आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी गिरीष दापकेकर, नगरसेविका शोभा परदेशी तसेच नगरसेविका सोनाली दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून महाराष्ट्राच्या घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या द्रष्ट्या नेत्याला विनम्र अभिवादन केले.
यावेळी नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी राबविलेल्या धोरणांची माहिती देताना त्यांनी औद्योगिक, कृषी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. दूरदृष्टी, लोकाभिमुख नेतृत्व आणि प्रगतिशील विचारसरणी ही त्यांच्या कार्याची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभिवादन कार्यक्रमास नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, मुकादम पुरुषोत्तम तेजी, श्याम गरुड, अनिल इंगळे, चंद्रशेखर खंते, बाळासाहेब पवळे, संतोष दाभाडे, आनंद जाधव, अतुल पठारे, बुद्धभूषण काकडे, राजेश भुजबळ, भिवा पिचड यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
तसेच श्रीमती ज्योती पेंडसे, उषा बेलेकर, वैशाली आडकर, नेहा पाटील, शितल कडूसकर, स्मिता बनसोडे, शितल चव्हाण, शिला वेहेळे, सुजाता घोडेकर, स्वप्नाली निवळकर, स्नेहल मते, मधुरा मुंडे, दक्षता भालेराव, अनिता कांबळे, शुभांगी माने, संध्या जोशी, मयुरी आडोळे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपत लोकहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. नगरपरिषद प्रशासनाने आयोजित केलेला हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.





