सामाजिक

मावळ मधील टाटा पॉवरच्या वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलनाचा निर्धार


मावळ मधील टाटा पॉवरच्या वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलनाचा निर्धार

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील शिरोता परिसरात होऊ घातलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी परिसरातील राखीव जंगलातील झाडे तोडल्यास शिरवता वन बचाव समिती,मावळ च्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सेव्ह सह्याद्री अभियानाच्या लढ्यात सामील होऊन मावळातील वृक्षतोडीविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मावळातील शिरोता, थोरण येथे होऊ घातलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी नियोजित वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी जनजागृतीच्या हेतूने तळेगाव दाभाडेमधील यशवंतनगरच्या फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सभागृहात रविवारी (ता.०१) संध्याकाळी सामाजिक संस्था,पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.पुणे,पिंपरी चिंचवड,तळेगाव दाभाडेसह मावळ तालुक्यातील पर्यावरणप्रेमी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, कुठल्याही परिस्थितीत काही झाले तरी एकही झाड तोडू द्यायचे नाही.थोरणचे जंगल वाचवायचे आहे.कर्जतमधील टोरेंट प्रकल्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक झाडे मावळात तोडण्याचा घाट घातला जात आहे.आमचे आंदोलन कुठल्याही पक्षाच्या अथवा नेत्याच्या विरोधात नाही तर.वृक्षतोडीविरोधात आहे.राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात कि आगामी औद्योगिक विकासाच्या गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्रात अतिरिक्त ऊर्जा आहे.औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे केवळ ५५% च क्षमतेने कार्यान्वित आहेत.गरज असेल तर महाराष्ट्र आणखी ऊर्जा निर्मिती करु शकतो.सदर प्रकल्प हे ऊर्जा निर्मितीसाठी नव्हे तर अतिरिक्त ऊर्जा बचतीसाठी आहेत.ज्यासाठी इतरही पर्याय उपलब्ध आहेत.कुठलीही प्रगत राष्ट्रे असा प्रयोग करत नाहीत.शाश्वत पर्याय म्हणून सौर ऊर्जा आणि बॅटरीच्या माध्यमातून हरित भविष्य वाचवता येईल असे असतानाही महाराष्ट्र सरकार पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या मागे का लागले आहे? याचे तात्विक उत्तर कुणीही देऊ शकत नाही.आज जर रतन टाटा जीवंत असते तर त्यांनी हा प्रकल्प रद्द केला असता.मात्र दुर्दैवाने सध्या टाटा आणि अदानी हे एकच आहेत.गरज नसतानाही महाराष्ट्र सरकारने या अनावश्यक प्रकल्पाचा घाट घातला आहे ही गोष्ट अतिशय किळसवाणी आहे.या प्रकल्पासाठी परवानग्या घेताना प्रत्यक्षात ग्रामसभा न घेता उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून बनावट कागद रंगवले आहेत.”हम करे सो कायदा” अशा सद्यस्थितीत न्यायालय अथवा कुठल्याही शासकीय यंत्रणांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याने याविरोधात संघर्ष करणे हा एकमेव मार्ग आहे.४८० एकरावरील हरित जंगलाची तोड केली जाणार आहे. पूनर्वसनात बाधित वन्यजीवांबाबत कुठेही विचार केलेला दिसत नाही.रोजगार निर्मिती हे फेक निगेटिव्ह आहे.स्वप्न दाखवून फक्त चुना लावला जात आहे.प्रकल्पांसाठी खोदकाम करताना ब्लास्टींग केल्यास डोंगर पाषण ढिले होऊन भविष्यात माळीणसारखा भुस्खलणाचा धोका आहे.बदल्यात नवीन झाडे लावण्याचे आश्वासन व्यवहार्य नाही.त्यामुळे सरकारने या प्रकल्पांचा पुनर्विचार करुन तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जनसेवक देवा गायकवाड यांनी जंगल वाचविण्यासाठी एकदिलाने संघटीत होण्याचे आवाहन मावळवासियांना केले.
प्रकल्प बाधित गावांतील स्थानिक युवक धंनजय गाडे,अक्षय शिंदे,शंकर गायकवाड,अमोल ठाकर,अमोल राणे,दौलत ठोसर आदींनी ही जंगलतोड झाल्यास बाधित क्षेत्रातील वन्यजीवांसह गावकऱ्यांवर होणाऱ्या दुसपरिणामांबाबत भीती व्यक्त केली.वृक्षतोडीविरोधात परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अँड.सोमनाथ पवळे म्हणाले कि महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या विध्वंसाचे मोठे षडयंत्र चालू आहे ते एकजुटीने हाणून पाडावे लागेल
समन्वयक नरेंद्र मु-हे यांनी मावळ तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने मावळच्या वृक्षतोडीविरोधातील या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
अँड.गणेश जगताप,सुपर्णा गायकवाड यांनी
आपल्या भुमिका मांडल्या.
फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लष्करी यांनी प्रास्ताविक आणि आभारप्रदार्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *