शहरसामाजिक

अर्थासाहित वंदे मातरम न.प. शाळेत जवानांबरोबर विद्यार्थ्यांनी केले सकल गायन सीआरपीएफ 242 बटालियनचा उपक्रम


अर्थासाहित वंदे मातरम न.प. शाळेत जवानांबरोबर विद्यार्थ्यांनी केले सकल गायन

 

सीआरपीएफ 242 बटालियनचा उपक्रम

 

तळेगाव दाभाडे :

तळेगाव रेल्वे स्टेशन जवळील लोकमान्य टिळक या 1918 मध्ये स्थापना झालेल्या प्राथमिक शाळा क्रमांक 3 मध्ये मंगळवारी 20 जून रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बटालियन 242 मधील अधिकारी आणि जवानांबरोबर विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याचे सकल गायन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ बटालियनचे उप कामंडन्ट कृष्ण कुमार झा, वरिष्ठ निरीक्षक जे. पी. सिंग, एम. सलीम, इनवल सिंग, के के पांडये, मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी, प्रा. ए. ए. खान उपस्थित होते.

 

यावेळी कामांडन्ट कृष्ण कुमार म्हणाले, की शिक्षक हे देशाचे भाग्यविधाते आहेत. वंदे मातरम या गाण्याचे महत्व आणि राष्ट्रप्रेमासाठी राहिलेल्या योगदानाचा त्यांनी आढावा घेतला. या गाण्याचा अर्थ समजावून सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना कर्तृत्ववान बनण्यासाठी प्रोत्साहित केले.

 

मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. या जवानांपासून प्रेरणा घेत आपणही काहीतरी मोठे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वंदे मातरम सकल समुहगायनाने परिसरात देशभक्तीचा सूर दुमदुमला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान, शिक्षकवृंद कमल पाटील, सुरेखा घरदाळे, अविनाश खुणे, जयश्री उंडे, प्रिती पारेकर, अनिता शिंदे, मिलिंद, डमरे, कविता खराडे आणि रूपेश काटकर आदी सहभागी झाले होते. शिक्षिका जयश्री उंडे यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *