शहरसामाजिक

मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या संकुलाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या संकुलाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

 

तळेगाव दाभाडे :

मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श विद्या संकुलाच्या प्रांगणात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका शैलजा काळोखे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नगरसेविका शैलजा काळोखे म्हणाल्या की, २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि भारत देश ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून औपचारिकरीत्या अस्तित्वात आला. आजच्या पिढीने संविधानातील मूल्ये आत्मसात करून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांच्या कलागुणांना वाव दिल्यास मुलांचे यश हे पालकांसाठीच ऊर्जा ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे, सहसचिव प्रा. वसंत पवार, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य माधुरी चंदनशिव, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय देवकर, आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संतोष खामकर, पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिज्ञा मांडे, सौ. अश्विनी कसबे , व पालकवर्ग तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव प्रा. वसंत पवार यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या विविधतेचे महत्त्व सांगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना समितीच्या अथक प्रयत्नांतून घडलेले भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी सिनियर महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रा. मंगल पोटे यांचे सुपुत्र सोहम संतोष पोटे यांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून अयोध्या येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना गाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श विद्या संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *