कामशेतमध्ये ज्येष्ठ पत्रकार गौरव पुरस्कार 2026 व तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन
कामशेतमध्ये ज्येष्ठ पत्रकार गौरव पुरस्कार 2026 व तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन
कामशेत : सह्याद्री विद्यार्थी अकादमी, मावळ व मराठी ग्रामीण पत्रकार संघ संलग्न कामशेत ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार गौरव पुरस्कार 2026 तसेच नृत्य तांडव 2026 या तालुकास्तरीय आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम कामशेत येथील गणेश मंगल कार्यालय, बाजारपेठ येथे पार पडणार असून तालुक्यातील विविध शाळांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि ग्रामीण भागातील पत्रकारितेला प्रोत्साहन मिळावे या दुहेरी उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पर्धा चार गटांत होणार आहे. ग्रुप १ मध्ये बालवाडी विभाग, ग्रुप २ मध्ये इयत्ता पहिली ते चौथी, ग्रुप ३ मध्ये इयत्ता पाचवी ते सातवी तर ग्रुप ४ मध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिवसभर रंगणाऱ्या या स्पर्धांनंतर सायंकाळी ६ वाजता बक्षीस समारंभ होणार आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येणार असून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी शिवानंद कांबळे (९२७०६५११७८), चेतन वाघमारे (८०८७४४६१५७), सुभाष भोते (८३९०७४४४०६), केदार डाखवे (९७६५३६६७७८), तेजस वाघवले (७०२०२७३२८६) व अनिष शर्मा (८६९८४५१२२२) यांच्याशी संपर्क साधावा.





