उद्योगताज्या घडामोडी

नववर्षाचे स्वागत चवीच्या जल्लोषात : हॉटेल सिरीषाची चायनीज मेजवानी, तब्बल ५० टक्के सवलत


नववर्षाचे स्वागत चवीच्या जल्लोषात : हॉटेल सिरीषाची चायनीज मेजवानी, तब्बल ५० टक्के सवलत

तळेगाव दाभाडे :
नववर्षाच्या आनंदात भर घालण्यासाठी तळेगाव येथील प्रसिद्ध हॉटेल सिरीषा यांनी चायनीज खाद्यप्रेमींसाठी खास धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. १ ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत हॉटेल सिरीषामध्ये व्हेज व नॉनव्हेज चायनीज पदार्थांवर ५० टक्क्यांपर्यंत बचत करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

खा मनसोक्त, पैसे फक्त अर्धेच या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली ही ऑफर अल्पावधीतच परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. जबरदस्त चव, दर्जेदार साहित्य आणि आकर्षक दर यांचा संगम म्हणजे हॉटेल सिरीषा, अशी ओळख आधीपासूनच आहे. यंदाच्या नववर्षानिमित्त या ओळखीला सवलतीची जोड मिळाल्याने ग्राहकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

जिजामाता चौक, TVS शोरूमजवळ असलेले हॉटेल सिरीषा हे कुटुंबीय, मित्रमंडळी तसेच तरुण वर्गासाठी लोकप्रिय ठिकाण ठरले आहे. चायनीज पदार्थांच्या वैविध्यपूर्ण मेनूमुळे नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक जण येथे भेट देत आहेत.

हॉटेलचे प्रोप्रायटर संकेश भेगडे यांनी सांगितले की, “ग्राहकांच्या प्रेमामुळेच आम्ही अशी खास ऑफर देऊ शकलो. नववर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकाने चवीचा आनंद घ्यावा, हाच आमचा उद्देश आहे.
ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच असल्याने नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *