राजकीय

कामशेत भाजपला नवे नेतृत्व विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती


कामशेत भाजपला नवे नेतृत्व विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

कामशेत : भारतीय जनता पक्षाच्या कामशेत शहर संघटनेत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, विविध आघाड्या व विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करून पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

जाहीर झालेल्या नियुक्त्यांमध्ये प्रवीण शिंदे यांची शहराध्यक्षपदी, तर दत्तात्रय भोईर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुरेखा बच्चे यांची महिला आघाडी अध्यक्षपदी, तर सलोनी सचिन वायकर यांची युवती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच रोहिणी दवंडे यांची ओबीसी आघाडी अध्यक्षपदी, उर्मिला काळे यांची महिला आघाडी कार्याध्यक्षपदी, अजिंक्य दौंडे यांची युवा मोर्चा अध्यक्षपदी, तर तुषार शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे कामशेत शहरातील भाजपच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. महिला, युवती, युवा तसेच विविध सामाजिक घटकांना पक्षाच्या संघटनात्मक प्रवाहात सहभागी करून घेणे, जनसंपर्क वाढविणे आणि तळागाळातील संघटन अधिक मजबूत करणे, ही प्रमुख आव्हाने नव्या नेतृत्वासमोर असणार आहेत.

नियुक्तीप्रसंगी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, रामदास काकडे, प्रशांत भागवत, गुलाब म्हाळसकर. गणेश भेगडे, शांताराम कदम, माऊली शिंदे, अभिमन्यू शिंदे शंकर शिंदे उपस्थित होते.

मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पक्ष संघटना अधिक कार्यक्षम, मजबूत आणि गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. नव्या संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून कामशेत शहरात पक्षाचा जनाधार आणि संघटनात्मक विस्तार अधिक व्यापक करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *