आरोग्य

शिरगावमध्ये अभिमान टाऊनशिपच्या मैलापाण्याने शेती उद्ध्वस्त. सहा वर्षांपासून शेत पडीक


शिरगावमध्ये अभिमान टाऊनशिपच्या मैलापाण्याने शेती उद्ध्वस्त. सहा वर्षांपासून शेत पडीक

शिरगाव (मावळ): शिरगाव येथील प्रसिध्द व नावाजलेल्या अशा अभिमान टाऊनशिपमधून सोडण्यात येणाऱ्या मैला मिश्रित पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून गेल्या सहा वर्षांपासून शेतजमीन पडीक पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरगावमधील शेतकरी महिपत रामचंद्र गोपाळे हे पूर्वी आपल्या शेतात भात शेती करत होते. त्यांच्या शेतात दरवर्षी चांगले उत्पादन होत असे. मात्र अभिमान टाऊनशिपमधून येणारे सांडपाणी थेट त्यांच्या शेतात सोडले जात असल्याने जमिनीची सुपीकता नष्ट झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या शेतात सतत मैला मिश्रित पाणी साचत असल्यामुळे कोणतेही पीक घेणे अशक्य झाले आहे.
अभिमान टाऊनशिप मधील जल शुद्धी प्लांट(STP) केवळ नावाला असल्याची माहिती मिळत आहे.
सदर सांडपाणी पुढे वाहत जाऊन थेट पवना नदीमध्ये मिसळत असल्याने पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रात दूषित पाणी मिसळल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात शेतकरी महिपती रामचंद्र गोपाळे यांनी संबंधित विभाग तसेच अभिमान टाऊनशिपमधील रहिवाशांशी अनेक वेळा चर्चा करून सांडपाणी शेतात सोडणे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *