महत्त्वाचे

तळेगाव दाभाडे नगरपरिषद खाते एका सहीचे साडेतीन लाख रुपये


तळेगाव दाभाडे नगरपरिषद खाते एका सहीचे साडेतीन लाख रुपये

 

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद भ्रष्टाचार आता शिगेला पोहोचला आहे. एका बांधकाम विकसकाने नाव न सांगण्याच्या अटीवर तळेगाव नगरपालिका एका सहीसाठी अनधिकृत पणे साडेतीन लाख रुपये टेबलाखालून मागते असा आरोप केला आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सरकार देत असलेल्या पगार कमी पडतोय का ? तळेगाव नगरपरिषद जनतेकडून घेत असलेला मालमत्ता कर पाणी कर व्यावसायिकर हा पैसा नक्की जातोय कुठे ?

तळेगाव नगर परिषदेमध्ये कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात वाढले अधिकारी टेबलावरून हलत नाहीत सुस्तपणे आराम करतात आणि कंत्राटी करण्याच्या माध्यमातून कचरा गाड्या कंत्राट उद्यानासाठी गाड्या कंत्राट स्वच्छतेसाठी गाडी कंत्राट गटारीसाठी वेगळे कंत्राट, सगळंच कंत्राटदार करतात तर या अधिकाऱ्यांची गरज फक्त पैसे खाण्यासाठी आहे का असा सवाल आता तळेगाव शहरातील नागरिक करू लागले आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराचा डोंगर बनलेली तळेगाव नगरपरिषद एक केला की दुसरा येतो आणि तोही तेच सुरू करतो हे थांबणार कधी ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. सन्मान महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सहसंपर्क अभिजीत आपटे यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनी तळेगाव नगर परिषदेचे उच्चस्तरीय चौकशी लावावी अधिकाऱ्यांच्या खाजगी मालमत्ता तपासाव्यात बँक खाते तपासावीत नातेवाईकांची माहिती काढावी गावाकडचे बंगले तपासावेत अशी मागणी जाहीर आवाहना द्वारे केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *