नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ‘श्री डोळसनाथ महाराज ठेव योजना’ जाहीर; १० टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याजदर
नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ‘श्री डोळसनाथ महाराज ठेव योजना’ जाहीर; १० टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याजदर
तळेगाव दाभाडे:संपादक:गणेश भेगडे
नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेची ओळख निर्माण करणाऱ्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने “नवीन वर्ष नवीन संकल्प नवीन योजना या घोषवाक्याखाली ‘श्री डोळसनाथ महाराज ठेव योजना’ जाहीर केली आहे. सर्वसामान्य ठेवीदार, लघुउद्योजक आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
या योजनेअंतर्गत ठेवींच्या कालावधीनुसार आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहेत. ३० ते ९० दिवसांसाठी ५ टक्के, ९१ ते १८० दिवसांसाठी ७ टक्के, १८१ दिवस ते १२ महिन्यांसाठी ८ टक्के, १३ ते २४ महिन्यांसाठी ९ टक्के, तर २५ ते ३६ महिन्यांच्या मुदतीसाठी तब्बल १० टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच ९० महिन्यांच्या कालावधीची दामदुप्पट ठेव योजनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संस्थेने आर्थिक प्रगतीकडे भक्कम पावले टाकत २०० कोटींच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. सध्या संस्थेचा एकूण निधी ४ कोटी रुपये असून भागभांडवल ३ कोटी ५० लाख रुपये आहे. कर्जवाटप ४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून एकूण ठेवी ५० कोटी, गुंतवणूक १५ कोटी आणि खेळते भागभांडवल ७० कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली.
या संदर्भात बोलताना पतसंस्थेचे खजिनदार अमित भसे म्हणाले कि “ठेवीदारांचा विश्वास हेच आमचे भांडवल आहे. पारदर्शक व्यवहार, सुरक्षित गुंतवणूक आणि वेळेवर परतावा देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. नवीन ठेव योजनेमुळे सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळेल, तसेच संस्थेची सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता अधिक मजबूत होईल.
नवीन वर्षात आर्थिक शिस्त आणि सुरक्षित गुंतवणुकीचा संकल्प करणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना एक उत्तम संधी ठरणार आहे.





