भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी इंदोरी–वराळे गटातून विशेष बससेवा; प्रशांतदादा भागवत युवामंचचा उपक्रम
भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी इंदोरी–वराळे गटातून विशेष बससेवा; प्रशांतदादा भागवत युवामंचचा उपक्रम
भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर इंदोरी–वराळे गटातील नागरिकांसाठी विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली. श्री. प्रशांतदादा भागवत युवामंच यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी होता आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून इंदोरी–वराळे गटातील बांधवांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
शौर्य, स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त दरवर्षी राज्यभरातून लाखो नागरिक येथे उपस्थित राहतात. मात्र प्रवासाच्या अडचणी लक्षात घेता अनेकांना सहभागी होता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशांतदादा भागवत युवामंचच्या वतीने विशेष बससेवेची आखणी करण्यात आली. सकाळी लवकर इंदोरी–वराळे परिसरातून बस रवाना होऊन नागरिकांना भीमा कोरेगाव येथे सुरक्षितरीत्या नेण्यात आले.
या वेळी मा. श्री. प्रशांतदादा भागवत व सौ. मेघाताई भागवत यांनी उपस्थित बंधू-भगिनींशी संवाद साधला. शौर्यदिनाचे ऐतिहासिक महत्त्व, सामाजिक सलोखा आणि भावी पिढीसमोर आदर्श उभा करण्याची जबाबदारी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. समाजात एकोपा टिकवून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश त्यांनी दिला. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाबद्दल आभार मानले.
दरम्यान, सौ. मेघाताई भागवत या जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटातून इच्छुक उमेदवार असून त्यांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी केलेल्या भेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची ओळख अधिक दृढ होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून त्यांच्या कार्यपद्धतीला समाजातील विविध घटकांकडून दाद मिळत आहे.
आदिवासी बांधवांसाठी शौचालय उभारणी, महिलांसाठी उपक्रम, तसेच सर्व समाजघटकांना समाविष्ट करून घेण्याची भूमिका ही मेघाताई भागवत यांच्या कार्याची ओळख ठरत आहे. निस्वार्थी सेवाभाव, सातत्यपूर्ण संपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे इंदोरी–वराळे गटाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.ओ





